औरंगाबाद, दि.07:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 284 जणांना (मनपा 149, ग्रामीण 135) सुटी देण्यात आली. आजपर्यंत11960 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 339 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16113 झाली आहे. आजपर्यंत एकूण 522 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3631 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सायंकाळनंतर 236 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 57, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 59 आणि ग्रामीण भागात 115 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (118)*
औरंगाबाद (24), फुलंब्री (4), गंगापूर (38), कन्नड (13), खुलताबाद (1),सिल्लोड (07), वैजापूर (14), पैठण (10), सोयगाव (04), मारोती मंदिराजवळ, सलामपूर (01), कोळीवाडा, गोळेगाव, अजिंठा (01), सरकारी हॉस्पीटल जवळ, धोत्रा, अजिंठा (01)
*सिटी एंट्री पॉइंट (57)*
नक्षत्रवाडी (02), गंगापूर (04), टीव्ही सेंटर (01), पडेगाव (02), रेल्वे स्टेशन परिसर (01), शिवाजी नगर (01), बजाज नगर (08), एन बारा (01), एन सात (01), गणोरी (01), नागेश्वरवाडी (01), एन एक (01), जालिपुरा (01), वाळूज (02), रांजणगाव (01), सिडको महानगर (01), गारखेडा (01), कन्नड (01), फुलंब्री (01),बिडकीन (01), संभाजी कॉलनी (01), सादात नगर (01), सातारा परिसर (03), पैठण (02), खुलताबाद (01), चित्ते पिंपळगाव (01),चिकलठाणा (03), गांधेली (01), आळेफाटा (01),सिल्लोड (01), वानखेडे नगर (04), अन्वा (01), अन्य (04)
*मनपा (02)*
कुँवरफल्ली, राजा बाजार (01), गारखेडा परिसर (01)
*तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत मुकुंदवाडीतील राजीव गांधी नगरातील 70 वर्षीय स्त्री, शहरातील खासगी रुग्णालयात पानवडोद,सिल्लोड येथील 45 वर्षीय पुरूष, खडकेश्वर,मिल कॉर्नर येथील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.