मुंबई दि. 8 : प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ८) जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्य असलेल्या डॉ.सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ.चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ दिनांक ७ एप्रिल रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ.सुभाष चौधरी (जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. कानपूरच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय चंहादे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
**
Dr Subhash Chaudhari to be new Vice Chancellor of
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University
The Governor of Maharashtra and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari today appointed Dr Subhash Rambhau Chaudhari as the new Vice Chancellor of the Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University.
Dr Subhash Chaudhari who is Professor and Principal of the J D College of Engineering and Management has been appointed as Vice Chancellor for a term of 5 years. He has been serving as the Acting Pro Vice Chancellor of the University.
Dr Chaudhari succeeds Dr Siddharvinayak Kane whose term as Vice Chancellor ended on 7th April. Dr Murlidhar Chandekar, Vice Chancellor of the Sant Gadge Baba Amravati University was holding the additional charge of the post of Vice Chancellor, RTMNU.
The Governor had constituted a Search Committee under the chairmanship of Justice Dilip Bhosle, retired Chief Justice of the Allahabad High Court to recommend to him a panel of names suitable for appointment of Vice Chancellor of the University.
Dr Abhay Karandikar , Director, IIT Kanpur and Dr Sanjay Chahande Principal Secretary, Water Supply and Sanitation were other members of the Committee.
The Governor announced the name of Dr Subhash Chaudhari after interviewing all the candidates recommended by the Committee.
000