बुलढाणा, दि. ७ – स्थानिक १०० खाटांच्या स्त्री रूग्णालयाचे कोविड रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे अद्ययावतीकरणाचे काम टाटा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. रूग्णालयाचे अद्ययावतीकरण अंतिम टप्प्यात असून या कामाची पाहणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी त्यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, निर्माण केलेल्या पायाभूत सोयी सुविधा, आयसीयु आदींची पाहणी केली. तसेच रूग्णालयाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सोमवार दि. १० ऑगस्ट २०२० रोजी होणाऱ्या ई – लोकार्पण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. प्रेमचंद पंडीत, सार्व. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, मुख्याधिकारी श्री. वाघमोडे आदींसह डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे दे. राजा येथील कोविड केअर हॉस्पिटलची पाहणीही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केली. या रूग्णालयाचे ई लोकार्पणही करण्यात येणार आहे. या रूग्णालयाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा व सुविधांचा आढवाही पालकमंत्री यांनी घेतला. याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.