आदिवासी बांधवांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्यास वन विभाग कटिबद्ध – वनमंत्री संजय राठोड

जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

मुंबई दि. ९ :- 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांनी राज्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात वनमंत्री श्री. राठोड म्हणतात, राज्यातील वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वनविभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सामुहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा मानस आहे.आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास,वृक्ष व फळबाग लागवड,वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण याबाबत वनविभाग काम करीत आहे. या योजनांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

देवेंद्र पाटील/ वि सं. अ.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.