सातारा जिल्ह्यासाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

खासदार शरद पवार यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द

सातारा दि. 9: सातारा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूसंदर्भात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात गृह विलगीकरण पुस्तिका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेचे प्रकाशन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करण्यात आले.

प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मान्यवरांच्या उपस्थितीत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.