(दि.2 ऑगस्ट 2020 ते दि.८ ऑगस्ट 2020 या कालावधीतील शासनाचे महत्वाचे निर्णय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.)
कोरोना युध्द
2 ऑगस्ट 2020
- आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक, ९ हजार ९२६ रुग्णांची घरी रवानगी. ९५०९ नवीन रुग्णांची नोंद, आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के. सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू २६०.
- पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत खर्च,राज्यात प्रथमच असा नावीन्यपूर्ण उपक्रम.मुस्लिम समाजामार्फत दोन मदरसे रुग्णांच्या क्वॉरंटाइनसाठी उपलब्ध, चार मोहल्ला रुग्णालय सुरू.
- २२ मार्च ते १ ऑगस्टपर्यंत २,१९,९७५ गुन्ह्यांची नोंद, ३२,४६७ व्यक्तींना अटक, विविध गुन्हयांसाठी १८ कोटी २४ लाख ४६ हजार १०४ रु. दंड.
3 ऑगस्ट 2020
- वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 419 विमानांनी 57 हजार 362 प्रवाशांचे मुंबईत आगमन. यामध्ये मुंबईतील प्रवासी- 19 हजार 383, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 19 हजार 570 आणि इतर राज्यातील प्रवासी- 18 हजार 409.
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महाड येथील एमआयडीसीमध्ये केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरचे ई-उद्घाटन व लोकार्पण. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित.सुविधा- 114 सामान्य कोविड केअर रुग्णांसाठी, 86 ऑक्सिजन सुविधेसह बेड आणि 10 अतिदक्षता विभागातील बेड उपलब्ध.
- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित, ठळक मुद्दे– विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील. कोविडशी सामना करण्यासाठी पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा, क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग,ट्रॅकींग आणि टेस्टींग मोठ्या प्रमाणात आवश्यक, मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णांची योग्य कळजी आणि रुग्णसेवा महत्त्वाची, स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत जागरुकता आवश्यक.
सुविधा-
- 7 हजार 980 चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रातील बेडची संख्या 206. सर्व बेड ऑक्सिजन सुविधायुक्त, केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभागाची निर्मिती, दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था, सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकीची उभारणी.
- भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्र- ऑक्सिजन सुविधायुक्त 165 बेडची व्यवस्था, सहा किलोलिटर साठवण क्षमतेची ऑक्सिजन टाकी. दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी 24 तास कार्यरत, विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅब, रुग्णांसाठी खानपान सुविधा
- सायबर संदर्भात ५७८ गुन्हे दाखल,२९० व्यक्तींना अटक.
- २२ मार्च ते २ ऑगस्ट पर्यंत कलम १८८ नुसार २,२०,२५६ गुन्ह्यांची नोंद ,३२,४६७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी १८ कोटी ३६ लाख ३९ हजार ४ रु. दंड
- सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्णांची घरी रवानगी, ८९६८ नवीन रुग्णांची नोंद, आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के. सध्या १ लाख ४७ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू २६६
४ ऑगस्ट २०२०
- नागपूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत आढावा. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री.सुनील केदार उपस्थित. निर्देश– ग्रामीण भागात कोरोना वाढीस लागला असून त्यावर मात करण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा.
- आज आतापर्यंत बरे झालेल्या सर्वाधिक रुग्णांची घरी रवानगी. सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. आज १२ हजार ३२६ रुग्णाची घरी रवानगी. ७७६० नवीन रुग्णांची नोंद. आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के. सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू – ३००.
- राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांची वेबिनारद्वारे चर्चा.ठळक मुद्दे– अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची तयारी, मात्र यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्यप्रणालीचे पालन करण्याची हमी देणे आवश्यक.
- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर, तपासणी मोहीम, आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवासुविधा, शासनस्तरावर लागणारी मदत याबाबींचा व्हीडिओ कॉन्फरंसिंगव्दारे आढावा. निर्देश– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षता घ्या. जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करा.
५ ऑगस्ट २०२०
- आज ६१६५ बऱ्या झालेल्या रुग्णांची घरी रवानगी. १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद. आतापर्यंत ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के, १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- ३३४
- वंदेभारत अभियानांतर्गत 427 विमानांनी आतापर्यंत 58 हजार 233 प्रवाशांचे आगमन, यामध्ये मुंबईतील प्रवासी- 19 हजार 638, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 19 हजार 817, इतर राज्यातील प्रवासी 18 हजार 778.
- गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मादान .
- मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील बैठकीत दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय. यावेळी दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार, राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे,राज्यमंत्री श्री.बच्चू कडू, उपस्थित. ही योजना आणखी एक वर्ष राबविण्याचा निर्णय. लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालावधीत ५ कोटी ९४ लाख ७३ हजार ६०६ लिटर दुधाची शेतकऱ्यांकडून खरेदी. ४९२७.७०२ मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन. २५७५. १७१ मेट्रिक टन लोण्याचे उत्पादन.
६ ऑगस्ट २०२०
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गुगलसोबतच्या भागीदारीची ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे घोषणा. यामुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्रित अध्ययन-अध्यापन करणे शक्य. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय उपलब्ध.ठळक मुद्दे- कोरोनाने उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्न हे दाखवले नाही तर ते स्वप्न प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
- वैशिष्ट्ये- जी स्वीट: जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूम परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम.
- गूगल क्लासरूमः शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात सहाय्य, वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास सहाय्य.
- गूगल फॉर्मः शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणारे साधन.
- असाइनमेंट्स: विश्लेषण आणि ग्रेड कोर्सवर्कची निर्मिती आणि विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता प्रदान करणारे साधन.
- राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे (मॉलेक्युलर लॅब) डिजिटल माध्यमातून लोकार्पण. नव्या कोरोना तपासणी लॅबमुळे मीरा, भाईंदर, वसई व पालघर येथील जनतेची व रुग्णांची सोय.
- 1 ऑगस्ट ते दि . 5 ऑगस्ट पर्यंत 4 लाख 79 हजार 402 गरीब व गरजू लोकांना शिवभोजन योजनेचा लाभ.
- जुलै महिन्यात 6 कोटी 64 लाख 23 हजार 346 लाभार्थ्यांना 63 लाख 53 हजार 268 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
- आज बऱ्या झालेल्या १० हजार ८५४ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के.आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे, सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू, आज निदान झालेले नवीन रुग्ण ११,५१४,नोंद झालेले मृत्यू ३१६.
७ ऑगस्ट २०२०
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने दूरदृश्य बैठक. श्री ठाकरे यांच्या विनंतीवरुन केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांचा सहभाग. यावेळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे उपस्थित. ठळक मुद्दे- कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही याची काळजी घ्या. रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष द्या, खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाई करा, बेड्स आणि रुग्णवाहिकांचे व्यवस्थित नियोजन करा. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमध्येही जम्बो सुविधांची निर्मिती करा. डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत असलेला कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करा.
- आज बऱ्या झालेल्या १० हजार ९०६ रुग्णांची घरी रवानगी. १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के . आतापर्यंत ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे. सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू ३००.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण आणि महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची पाहणी. ‘कोरोना’ संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन या केंद्रांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
- आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सुविधेचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
- खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे निर्देश.
- पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेली पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र ठरणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री श्री धनंजय मुंडे यांची माहिती.
- तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दि. १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबवणार असल्याची उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती. संपर्क संकेतस्थळ- http://www.dtemaharashtra.gov.in/
8 ऑगस्ट 2020
- गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या पूर्ण. आज बरे झालेल्या ११ हजार ८१ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के, आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे. आज १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान. सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- २७५.
- वंदेभारत अभियानांतर्गत 448 विमानांनी आतापर्यंत 61 हजार 042 प्रवाशांचे आगमन. मुंबईतील प्रवाशांची संख्या 20 हजार 768, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या- 20 हजार 501 इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 19 हजार 773.
- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देण्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकित निर्देश.
- सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असल्यास त्यांना फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.
इतर निर्णय आणि घडामोडी
3 ऑगस्ट 2020
- क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या नागरिकांना शुभेच्छा.
- पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरा.
४ ऑगस्ट २०२०
- उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक. यावेळी परिवहनमंत्री श्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री श्री सतेज पाटील उपस्थित. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय.
- केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत अभिनंदन.
- ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत दुःख व्यक्त.
- उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय आदी विभागात शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचे, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांचे संबंधित विभागांना निर्देश. इतर सूचना –औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत असले पाहिजे. कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करावी. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करा. महावितरणच्या तक्रार निवारण कक्षामध्ये मराठी भाषेतून कामकाज आवश्यक. राज्यात कायदे तयार होताना त्याचा मूळ प्रस्ताव मराठी भाषेतच तयार करणे शक्य आहे का, याची तपासणी करा. जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व लघु न्यायालयात मराठीचा वापर कोणत्या स्तरावर केला जातो, याची सांख्यिकी माहिती उपलब्ध करून द्या.
- पलूस पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. यावेळी नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विश्वजित कदम, उपस्थित. निर्देश-पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी.
५ ऑगस्ट २०२०
- रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ,औषधी रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी शक्य, ९ ऑगस्टला राज्यात रानभाज्या महोत्सव घेणार असल्याची कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांची माहिती.
- अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विद्युत विकास कामांबाबत महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक. जिल्ह्यात नवीन उपकेंद्रांची उभारणी,उपकेंद्रांमधील क्षमता वाढ व अति उच्च दाब उपकेंद्रे प्रस्तावित करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश, संगमनेर तालुक्यातील खांबे, खिरविरे, पारेगाव खुर्द येथील उपकेंद्रांच्या उभारणीसाठी तातडीने मंजुरी घेण्याची सूचना.
- माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,गृहमंत्री श्री अनिल देशमुख,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण,महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात,शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्यामार्फत शोक व्यक्त.
- माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ,महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री श्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत शोक व्यक्त.
६ ऑगस्ट २०२०
- केंद्र शासनामार्फत 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा विभागाचा निर्णय, यामुळे गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती.
- पुण्यनगरी वृत्तपत्रसमुहाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ व्यावसायिक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,सांस्कृतिक कार्य मंत्री श्री अमित देशमुख,अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांची श्रध्दांजली.
- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करण्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश, जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षांच्या संपर्कात राहून कोकण, कोल्हापूर भागातील परिस्थितीचा आढावा.नागरिकांना तातडीने सहाय्य करण्याचे निर्देश,मुंबईतील परिस्थिती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना केले अवगत.
- राज्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्याची मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची माहिती.
७ ऑगस्ट २०२०
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2028 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
- मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक. महत्वाचे निर्णय-‘सफेद चिप्पी’ ( sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता, असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना, वन्यजीव उपचार केंद्रांची तातडीने उभारणी, आंग्रीय पठार नियुक्त क्षेत्र घोषित करण्याची शिफारस, राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक, अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेजसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याच्या मताचे वन्यजीव मंडळाकडून समर्थन.
- ज्येष्ठ नेते, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत दु:ख व्यक्त.
8 ऑगस्ट 2020
- डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती.
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2020 ची 8 सप्टेंबर 2020 रोजी परतफेड.
- समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत प्रायोजकत्व दिलेल्या अनुसूचित जातीतील १४ विद्यार्थ्यांनी नागरी सेवा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्यल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याद्वारे अभिनंदन केले.
- नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आदीबाबत गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
- कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांची भरतनगर येथील श्री साठे यांच्या निवासस्थानी भेट आणि कुटुंबियांची सांत्वना.
- गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट. पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत पाहणी. दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक.