जिल्ह्यात 12346 कोरोनामुक्त, 3858 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.09: औरंगाबाद जिल्ह्यात आज 200 जणांना (मनपा 86, ग्रामीण 114) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12346 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 263 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16753 झाली आहे. आजपर्यंत एकूण 549 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3858 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 165 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 69 , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 27 आणि ग्रामीण भागात 44 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*ग्रामीण (49)*
बाबरा, फुलंब्री (1), लाडगाव रोड, वैजापूर (1), अजिंठा,सिल्लोड (1), समता नगर,सिल्लोड (1)
कन्नड (1), औरंगाबाद (18), फुलंब्री (2), गंगापूर (4), कन्नड (7), वैजापूर (4), पैठण (9)
*मनपा (20)*
एन सहा, टापरी मार्केट, सिडको (1), गारखेडा (1), आरेफ कॉलनी (1), नक्षत्रवाडी (1), देवळाई रोड, राम मंदिर परिसर (1), वेदांत नगर (1), नगारखाना, सुपारी हनुमान मंदिर परिसर (1), अमित नगर, नंदनवन कॉलनी (1), वसुंधरा कॉलनी, नंदनवन कॉलनी (1), वानखेडे नगर (2), अन्य (9)
*सिटी एंट्री पॉइंट (69)*
एन दोन (2), दौलताबाद (1), संभाजी कॉलनी (1), तिसगाव (1), सातारा परिसर (2), प्रताप नगर (1), शहानूरमिया दर्गा (1), एन अकरा (2), द्वारका नगर (1), गारखेडा (1), पुंडलिक नगर (1), पिसादेवी (1), शेंद्रा एमआयडीसी (3), जय भवानी नगर (1), कुंभेफळ (1), पडेगाव (2), वाळूज (1), मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर (1), पैठण (1), जवाहर कॉलनी (4), इटावा (1), वानखडे नगर (2), जाधववाडी (1), अंधारी (2), मिल कॉर्नर (2), नायगाव (1), सावंगी (1), कन्नड (1), गरम पाणी (2), बजाज नगर (7), रांजणगाव (6), नंदनवन कॉलनी (2), म्हाडा कॉलनी (1), वडगाव कोल्हाटी (3), गांधेली (1), अन्य (6)
*दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत काटेपिंपळगावातील 66, शहरातील साई नगर सिडकोतील 69, अंभई, सिल्लोडमधील 69, अडूळ पैठण येथील 75 वर्षीय स्त्री,निल्लोडमधील 65 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत रोशन गेट येथील 41, नवजीवन कॉलनीतील 50, समता नगरातील 49, मुकुंदवाडीतील 59 वर्षीय स्त्री आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील परिसरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.