Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. ११ : “हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं..” सारख्या शेरो-शायरीच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांचं निधन ही भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक विषयांवर मार्मिक भाष्य करणारा, भावना, वेदना, संवेदनांना जिवंत करणारा, शब्दांचा जादूगार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.