राज्य सहकारी बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत

आठवडा विशेष टीम―

मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपुर्द

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला असून आज तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि सरव्यवस्थापक दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बँक व्यवस्थापनाला या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.