बीड: लिंबागणेश बसस्थानकासमोर केळीचा ट्रक पलटला ,जिवितहानी नाही

Last Updated by संपादक

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे,अपघातास निमंत्रण ठरत आहे, केळी भरलेला ट्रक उलटला ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रार,रास्ता रोकोचा ईशारा – डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.१२: आज दि. १२/०८/२०२० वार बुधवार रोजी सकाळी ४ वा.लिंबागणेश बसस्थानक येथे ड्रायव्हर अफसर आली महाराष्ट्र बारामती येथुन केळींनी भरलेला ट्रक. गाडी नंबर यु.पी. ७२टी ९१३२ उत्तरप्रदेश-बिहार याठीकाणी जात असताना पहाटे ४ वा. लिंबागणेश बसस्थानक येथे दुभाजकासाठी खोदलेल्या खड्ड्यात चाक गुंतुन पलटला.सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे.

img 20200812 wa00075230566379614727116

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे, अपघातास निमंत्रण मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ५४८-डी या रसत्याचे काम ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश या ठिकाणी दुभाजकाचे काम अपुर्ण असुन आणि पथदिवे सुद्धा न लावल्यामुळे दुभाजकासाठी खोदलेला खड्डा दिसतच नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

मांजरसुंभा-पाटोदा रस्ता , दुभाजक, पथदिवे, गतिरोधक आदिसाठी मा.नितिन गडकरी यांना लेखी निवेदन – डॉ.गणेश ढवळे

मांजरसुंभा ते चुंभळी फाटा या ३३ कीलोमीटर रस्त्याचे १६० कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याचे काम हुले कन्स्ट्क्शन मार्फत दोन वर्षांमध्ये बंधनकारक असताना साडे ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश , मुळुक, वैद्यकिन्ही या गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मौजे लिंबागणेश,वैद्यकिन्ही, पाटोदा याठिकाणी दुभाजकाचे काम रखडलेले , असुन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. याविषयी रखडलेले काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे यासाठी दि.२७/०८/२०२० रोजी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.