आठवडा विशेष टीम―
राज्यात आज पुन्हा १३ हजार ४०८ एवढ्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१२ : राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १२,७१२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (५०), ठाणे- २२९ (१), ठाणे मनपा-२२० (०),नवी मुंबई मनपा-४३२ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१५),उल्हासनगर मनपा-२९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२० (१), मीरा भाईंदर मनपा-१४५ (११), पालघर-२४९ (९), वसई-विरार मनपा-२१४ (४), रायगड-२२१ (३), पनवेल मनपा-१९३, नाशिक-२७२ (८), नाशिक मनपा-८१६ (१८), मालेगाव मनपा-४४ (२),अहमदनगर-३३८ (३),अहमदनगर मनपा-२९५ (३), धुळे-३७ (२), धुळे मनपा-५३ (१), जळगाव-३५३ (११), जळगाव मनपा-६३ (५), नंदूरबार-३५ (४), पुणे- ३६९ (११), पुणे मनपा-१६६५ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-९४८ (११), सोलापूर-३२० (८), सोलापूर मनपा-६० (३), सातारा-२७० (८), कोल्हापूर-३९६ (१७), कोल्हापूर मनपा-२३८ (२), सांगली-८८ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-९३ (१०), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-८१ (२), औरंगाबाद-२१३ (२), औरंगाबाद मनपा-११६ (१), जालना-९६ (३), हिंगोली-२७ (१), परभणी-१७ (३), परभणी मनपा-३९ (४), लातूर-१६६ (१०), लातूर मनपा-७७ (६), उस्मानाबाद-१२१ (७), बीड-९४ (२), नांदेड-१०९ (५), नांदेड मनपा-२५ (५), अकोला-१३ (१), अकोला मनपा-३१ (१),अमरावती-४१ (१), अमरावती मनपा-६३ (३), यवतमाळ-१३९ (१), बुलढाणा-५४ (१), वाशिम-३७ (१), नागपूर-३१८ (५), नागपूर मनपा-४५४ (२४), वर्धा-११, भंडारा-१८ (१), गोंदिया-२७ (२), चंद्रपूर-३६, चंद्रपूर मनपा-९ (१), गडचिरोली-१३, इतर राज्य १४ (२).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख १५ हजार ११५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ८८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,२६,३५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,०६९), मृत्यू- (६९४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०४७)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,०८,३९९), बरे झालेले रुग्ण- (८५,४२७), मृत्यू (३१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,८४६)
पालघर: बाधित रुग्ण- (१९,५१२), बरे झालेले रुग्ण- (१३,४९१), मृत्यू- (४५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६७)
रायगड: बाधित रुग्ण- (२१,३०७), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२५)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२३८८), बरे झालेले रुग्ण- (१५१०), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८८)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)
पुणे: बाधित रुग्ण- (१,१९,६२८), बरे झालेले रुग्ण- (७६,९२५), मृत्यू- (२८६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,८३८)
सातारा: बाधित रुग्ण- (६२२९), बरे झालेले रुग्ण- (४००१), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४१)
सांगली: बाधित रुग्ण- (५१९८), बरे झालेले रुग्ण- (२६२३), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१६)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (११,१७६), बरे झालेले रुग्ण- (५२८९), मृत्यू- (२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६११)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१२,८३६), बरे झालेले रुग्ण- (७४०१), मृत्यू- (६०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२९)
नाशिक: बाधित रुग्ण- (२२,५७७), बरे झालेले रुग्ण- (१४,३४०), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६२१)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (११,०३३), बरे झालेले रुग्ण- (७०००), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९१८)
जळगाव: बाधित रुग्ण- (१५,७८०), बरे झालेले रुग्ण- (१०,७१९), मृत्यू- (६३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२२)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (१०००), बरे झालेले रुग्ण- (५९५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)
धुळे: बाधित रुग्ण- (४३६३), बरे झालेले रुग्ण- (२९७१), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५७)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,२१९), बरे झालेले रुग्ण- (११,४३७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२२६)
जालना: बाधित रुग्ण-(२७७२), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५१)
बीड: बाधित रुग्ण- (२२३३), बरे झालेले रुग्ण- (६२८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६४)
लातूर: बाधित रुग्ण- (४४०७), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४५)
परभणी: बाधित रुग्ण- (१२२८), बरे झालेले रुग्ण- (४९३), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८८)
हिंगोली: बाधित रुग्ण- (८६२), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८)
नांदेड: बाधित रुग्ण- (३४६९), बरे झालेले रुग्ण (१५०५), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३९)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२८५८), बरे झालेले रुग्ण- (१२७९), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०६)
अमरावती: बाधित रुग्ण- (३१२६), बरे झालेले रुग्ण- (२०५२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८४)
अकोला: बाधित रुग्ण- (३१०३), बरे झालेले रुग्ण- (२४८७), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)
वाशिम: बाधित रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (६६७), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२०६५), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७५४), बरे झालेले रुग्ण- (११४९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)
नागपूर: बाधित रुग्ण- (१०,६०८), बरे झालेले रुग्ण- (३७५८), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५७)
वर्धा: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)
भंडारा: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (८४३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५६), बरे झालेले रुग्ण- (३४१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७)
एकूण: बाधित रुग्ण-(५,४८,३१३) बरे झालेले रुग्ण-(३,८१,८४३),मृत्यू- (१८,६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,५१३)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक -१२,ठाणे जिल्हा –११, पालघर -३, कोल्हापूर -३, परभणी -२, धुळे -२ , उस्मानाबाद -२,औरंगाबाद -१,लातूर- १, नंदूरबार -१, सांगली -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)