महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. 12 : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज वर्ष २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरु झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक

  • श्री. शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर )
  • श्री. राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक
  • श्री. उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलीस निरीक्षक
  • श्री. नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
  • श्रीमती ज्योती लक्ष्मण क्षिरसागर, पोलीस अधीक्षक
  • श्री. अनिल तुकाराम घेरडीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी
  • श्री. नारायण देवदास शिरगावकर, उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)
  • श्री. समीर नाजीर शेख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर)
  • श्री. किसन भगवान गवळी, सहायक पोलीस आयुक्त
  • श्री. कोंडीराम रघु पोपेरे , पोलीस निरीक्षक

विशेष पोलीस पदकासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली असून यात केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.