भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाच्या शासकीय समारंभाचे थेट प्रक्षेपण

Last Updated by संपादक

औरंगाबाद,दि.14:आठवडा विशेष टीम― भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वा. होणार आहे.
ध्वजारोहण उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेवून नागरिकांना घरबसल्या ध्वजवंदन कार्यक्रम पाहता यावा, यासाठी प्रशासनाने ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एमसीएन स्थानिक वृत्त वाहिनीवरुन (चॅनल क्र. 122 व 523 (एचडी)) तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/DIOAuranagabd या फेसबुक पेजवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास निमंत्रितांनी मास्क परिधान करुन उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, प्र. जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी केले आहे.
00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.