आठवडा विशेष टीम―
हिंगोली, दि. १४ : पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी औंढा तालुक्यातील मौजे येहळेगाव (सोळंके) गावातील अतिवृष्टीग्रस्त शेत-शिवाराची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन संबंधित विभागास बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार राजु नवघरे, सरपंच श्रीमती सुनंदाबाई भिमराव सोळंके, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होते.