प्रशासकीयब्रेकिंग न्युज

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार – कु.आदिती तटकरे

आठवडा विशेष टीम―

अलिबाग,जि. रायगड दि.15: ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त व पोषण मूल्य असलेल्या असून त्या नामशेष होऊ नयेत आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक लाभ व्हावा, म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 52 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सूचित केले की, या रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचा उपक्रम स्वागतार्ह असून या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व महिला शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि मधुकर पाटील, अमित उकडे, आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते.

रोहा ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण

रोहा ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव आणि मधुकर पाटील, अमित उकडे, रोहा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

मापगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

ग्रुप ग्रामपंचायत मापगाव, ता.अलिबाग येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला.

यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार श्री.मधुकर ठाकूर, श्री.प्रवीण ठाकूर, श्री.सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, गट विकास अधिकारी, पं.स.,अलिबाग सौ.दीप्ती पाटील, मापगाव सरपंच श्रीमती अनिता थळे, ग्रामसमिती सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनाथ बालकांना शालेय साहित्याचे वाटप

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे भेट देऊन तेथील निराधार, आई-वडील नसलेल्या बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप केले. या बालग्राम मध्ये 157 विद्यार्थी आहेत. यावेळी पालकमंत्री महोदयांनी येथील बालकांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, संस्थेचे संचालक राकेश सिन्हा, सहाय्यक संचालक शिवरुद्र लुपने, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.