कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

चंद्रपूर दि. 15 ऑगस्ट: कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचा  स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही लढाई अजून संपलेली नसून लोकांनी यापुढील काळातही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, अशा सूचना सुध्दा यावेळी केल्या.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी जिल्हाधिकारी संपत खलाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सुषमा साखरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  डॉ.उदय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एस. एस. मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल भोंगडे, डॉ. अविष्कार खांडरे, अधिपरिचारिका रजनी आनंदे, स्मिता मानकर, किरण वैरागडे, वरिष्ठ औषधी निर्माण अधिकारी विवेक माणिक यांना उत्कृष्ट कार्य कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकारी डॉ.संदीप गेडाम, अँटीजेन टेस्टिंग नोडल अधिकारी  डॉ.प्रकाश साठे, कंटेनमेंट अधिकारी डॉ.प्रतिक बोरकर, आईएलआय व सारी रिपोर्टिंग अधिकारी डॉ.प्रीती राजगोपाल, कॉल सेंटर इन्चार्ज डॉ.माधुरी मेश्राम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन राऊत, डि.सी.सी.सी कॉल सेंटर अधिकारी डॉ.मीना मडावी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषद समन्वय अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार, दस्तावेज अधिकारी डॉ.अकील कुरेशी, साथरोग अधिकारी डॉ.सचिन भगत, कॉल सेंटर अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्य, तालुका आरोग्य अधिकारी सिंदेवाही डॉ.ललित पटले, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापुर डॉ.अमित जयस्वाल, आरोग्य सहाय्यक प्रेमचंद वाकडे, नितीन झोडे, आयईसी समन्वयक अब्दुल वाहाब कुरेशी, ब्लॉक फॅसीलेटर प्रियंका बुरूले, प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी गणपती सिडाम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर आशा सेविका किरण दहिवले,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर, सहाय्यक प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र विभाग डॉ.सचिन धगडी, डॉ. अपेक्षा नागदेवते, अधिपरिचारिका सपना बावणे, वैशाली वाघमारे, प्लाज्मा डोनर सुहानी चावरे, आशिष बोथरा, श्याम मेश्राम प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय खेरा, डॉ.शरयू गावंडे, आरोग्य विभाग पिंकी बावणे, ज्योती व्यवहारे, मिथुन लोहकरे, मंजुषा वरहाते, आशा सेविका वंदना कडस्कर, संगीता विशरीजवार, सफाई कर्मचारी दिनेश खोटे, महेंद्र खोटे रामकिशोर बिरिया, देवानंद छप्परबंद, विशाल हाते, प्रीतम मलिक तर एनजीओ जगुया थोडसं माणुसकीसाठी व बोहरा समाजसेवा चंद्रपुर यांना गौरविण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाचा काळात प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सन्मान तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तसेच इतर लगतच्या राज्यातील हजारोच्या संख्येने मिरची तोडण्या करिता गेलेले कामगार मे 2020 या कालावधीत गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावातील सीमेवर आले असता सदर कामगारांची व्यवस्था करण्याकरिता पोडसा गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच देविदास सातपुते यांनी प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोरोना बाधित रुग्णाच्या विलगीकरण करिता विनामुल्य कोविड सेंटर उपलब्ध करून देऊन प्रशासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल इन्स्पायर अकॅडमीचे विजय बदखल व शकुंतला लॉनचे अमोल पत्तीवार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर कडून केलेल्या उत्कृष्ट कार्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून विवेक कोहळे व कनिष्ठ लिपिक प्रमोद गेडाम यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गावी पोहोचते करण्याकरिता घेतलेल्या विशेष परिश्रमाकरीता राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी व गोंडपिपरी तहसीलदार सीमा  गजभिये यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्यातर्फे तहसीलदार संजय राईंचवार यांनी सन्मानपत्र स्वीकारले.

कोरोना कालावधीत प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील समन्वय साधून प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याकरिता घेतलेल्या विशेष परिश्रमाकरिता जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय,चंद्रपूर( पोलीस कोरोना योद्धा) पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे, सहाय्यक फौजदार विजय मुके, सुजित बंडीवर ,पोलीस हवालदार दिलीप कुर्जेकार, बळीराम पवार, रवी चेरकुलवार, रमेश गुंडावार, नायक पोलीस मिलिंद दोडके, रामराव टेकाम, पोलीस शिपाई संदीप कांबळी, दिलीप इंगळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, आंतरिक सेवा सुरक्षा पदक मंजूर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक शेखर पोपट देशमुख, पोलीस निरीक्षक किसन शेळके, हृदय नारायण यादव, ओमप्रकाश कोकाटे, स्वप्नील धुळे, दीपक गोतमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारे, महेश कोडवार, प्रशांत केदार, महेंद्र आंभोरे, विनीत घागे, रमीझ मुलानी, पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर, विकास मुंढे, निलेश वाघमारे, संदीप कापडे, आकाशकुमार साखरे, पोलीस शिपाई विशाल बेझलवार, सुनील आत्राम, नायक पोलीस संतोष पानघाटे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मंजूर झालेले कर्मचारी सहाय्यक फौजदार विजय मुक्के, अहमद अली उस्मान अली, पोलीस हवालदार विजय हरदीया, गणपत वाढई, सुधीर सायंकार, नायक पोलीस महेश मांढरे, प्रकाश बलकी, विनोद मुरकुटे, विकास आलाम, दिनेश धनविजय, महिला नायक पोलीस श्रीमती मंगला आसुटकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक मंजूर झालेले कर्मचारी सहाय्यक फौजदार रमेश बरडे, जनार्धन मोहुरले यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.