पाटोदा तालुकाबीड जिल्हाहेल्थ

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात बीडचे सिव्हिल सर्जन येताच...पहा काय घडला प्रकार ?

पाटोदा दि.०४: पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला बीड चे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांच्या अचानक भेटीने कर्मचा-यांची धावपळ झाली.काल दिनांक ३ मार्च रविवारी सायंकाळी साडेसात वाजता डॉ.थोरात यांनी अचानक भेट दिली यावेळी दवाखान्यात ड्युटीवर असलेले डॉक्टर व इतर काही कर्मचारी उपस्थित नव्हते.शिपायाने फोन केल्यावर काही वेळाने ड्युटीवर असलेले कर्मचारी आले. यावेळी डॉ अशोक थोरात यांनी दवाखान्यात अॅडमिट असलेल्या पेशंटची चौकशी करून दिलेल्या उपचारांची माहिती घेतली. एकंदरीत दवाखान्यात ड्युटीवर असलेले सर्व कर्मचारी उपस्थित नव्हते, डॉक्टरांचे सुचनेनुसार अॅडमिट पेशंटला योग्य औषधोपचार दिलेले नव्हते, पेशंटला संबंधित डॉक्टरांनी भेट दिली नाही, दवाखान्यातील अनेक बाबींच्या त्रुटी याविषयी डॉ.थोरात यांनी नाराजी व्यक्त करत सुधारणा करण्याच्या कडक सूचना दिल्या. या सरप्राइज व्हिजीट मध्ये जवळपास अर्धा तास थांबून सिव्हिल सर्जन यांनी चांगली चौकशी केली आणि अशाचप्रकारे अधूनमधून भेटी दिल्या पाहिजेत अशी दवाखान्यातील पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी भावना व्यक्त केल्या.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.