उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील मौजे पाटोदा येथे 11 ऑगस्ट रोजी घडलेले बाललैंगीक आत्याचाराचे प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिका-यांना मंगळवार,दिनांक 18 ऑगस्ट रोजी मौजे पाटोदा येथील महीला-पुरूष नागरिकांचे वतीने देण्यात आले.
उपविभागीय अधिका-यांना मंगळवारी देण्यात आलेल्या निवेदनाची पार्श्वभूमी अशी की,मौजे पाटोदा येथे 11 ऑगस्ट रोजी मौजे पाटोदा गावातील अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करून आत्याचार केला असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिसांनी भादंवी कलम 363, 366 (अ),354 (ड) 812 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केल्याचे समजते.पुढील काळात बाललैंगीक आत्याचाराच्या अशा घटना घडू नयेत.त्यांना आळा बसावा.सध्या महाराष्ट्रात अशा अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.असे कृत्य करणा-या नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.मौजे पाटोदा प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करण्यासाठी सरकारने संबंधित बाललैंगीक आत्याचाराचे प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी करून प्रशासनाने सदर आरोपीवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली तर आम्ही शासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर निवेदक मनोज पाडुळे,कैलास पाडुळे, संतोष पाडुळे,शाहूराव पाडुळे,बळीराम सरवदे,महानंदा पाडुळे,वर्षा पाडुळे, चेतना पाडुळे,मनोरमा सरवदे,मालन जोगदंड,निकिता सरवदे,नीलम पाडुळे, सुलाबाई पाडुळे,मंगल पालके,चंद्रकला जाधव,शारदा पाडुळे, भारत पाडुळे यांच्या स्वाक्ष-या आहेत.तर निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना माहीतीस्तव देण्यात आली आहे.