Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदनात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी श्री गोयल यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांनीही आदरांजली वाहिली.