अंबाजोगाई (प्रतिनिधी): माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त कृषि महाविद्यालय,अंबाजोगाई येथे गुरूवार,दिनांक 20 ऑगस्ट रोजी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.त्यांनी उपस्थित सर्व आधिकारी व कर्मचारी यांना सदभावना दिनानिमित्त सामुहिक प्रतिज्ञा दिली.याप्रसंगी डॉ.ठोंबरे म्हणाले की,माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचे संगणक क्षेत्रातील क्रांती,दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान,नवोदय विद्यालय,नवीन शैक्षणिक धोरण,पंजाब शांती करार असे अनेक इतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास केला एवढे मोठे योगदान आहे.या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.प्रताप नाळवंडीकर, प्रा.सुनिल गलांडे,डॉ. विद्या तायडे,डॉ.योगेश वाघमारे,पुजा वावरगिरे,सय्यद इरफान,स्वप्नील शिल्लार,अनंत मुंढे,भास्कर देशपांडे,राजेश रेवले व इतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी डॉ.बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी मानले.