प्रशासकीयब्रेकिंग न्युज

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : पालकमंत्र्यांच्या हस्ते १२ कुटुंबांना धनादेश वितरित

आठवडा विशेष टीम―

यवतमाळ, दि. 24 : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत नेर तालुक्यातील 12 कुटुंबाना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 लक्ष 40 हजार रुपयांचे धनादेश पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. नेर येथील विश्रामगृहात पालकमंत्र्यांनी लाभार्थी कुटुंबांना धनादेश दिले. यावेळी जि.प.सदस्य भरत मसराम, न.प.उपाध्यक्ष पवन जयस्वाल, कृऊबास सभापती भाऊराव झगडे, उपभापती प्रवीण राठोड, मनोज नाले, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, नायब तहसीलदार संजय भोयर, रुपेश गुल्हाणे आदी उपस्थित होते.

 

कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर मदत म्हणून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मदत दिल्या जाते. त्यानुसार 12 कुटुंबांना ही मदत देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री राठोड यांनी नेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले. तसेच सोयाबीनवर आलेल्या कीड व रोगामुळे खराब झालेल्या पिकाची तात्काळ पाहणी करून अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सावरगाव येथे दिल्या.

 

पीक कर्जासंबंधात ज्या बँकेतून कर्जमाफी झाली त्याच बँकेतून पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांमार्फत जिल्ह्य़ातील सर्व बॅंकांना दिल्या.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.