राज्यपालांनी केले भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई,दि.२४ : पर्यावरण, आरोग्य, प्लास्टिक-मुक्त भारत, जनसेवा यांसह विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या भामला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या नविनीकृत संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २४) राजभवन येथे झाले. (bhamlafoundation.org)यावेळी अभिनेते शेखर सुमन, गीतकार स्वानंद किरकिरे, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त अजिंक्य पाटील, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भामला फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले की, समाजासाठी केलेले कोणतेही काम छोटे वा मोठे नसते. समाज सेवा अनेक प्रकारे करता येते. मान, मरातब, पुरस्कार या गोष्टींनी सेवेचे मूल्य ठरत नाही. तर सेवेतून मिळणारे समाधान, संतोष व आनंद हेच समाजसेवेचे सर्वात मोठे फळ असते. सेवेचा फायदा समाजाला तसेच भावी पिढ्यांना मिळतो असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.