Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―मुंबई दि. 3- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत डाळीचे माहे जुलै 2020 व माहे ऑगस्ट 2020 या महिन्याकरीता वितरण सुरू करण्यात आले आहे. ही योजना माहे नोव्हेंबर, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
डाळीचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर डाळ प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहनही करण्यात आले आहे.