आठवडा विशेष टीम―मुंबई, दि. 3 :- पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं असून समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवून वंचित, उपेक्षित, कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणारं नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पुण्याच्या जडणघडणीतील त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.