आठवडा विशेष टीम― मुंबई दि.3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पहिला भाग ‘कोरोना: संसर्गाचे स्त्रोत व विविध चाचण्या’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर शुक्रवार दिनांक 4 व शनिवार दि.5 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल.ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती, बाधित व अॅक्टिव्ह रुग्ण, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण, मृत्यूदर कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, हर्ड इम्युनिटी, सिरो सर्वेक्षण म्हणजे काय, ज्यांना लक्षण नाहीत ते लोकं इतरांना हा संसर्ग देऊ शकतात का, अॅंटीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट, अॅंटीबॉडी टेस्ट यामधील फरक,कोरोना चाचण्या करण्यासाठी शासनाच्या व्यवस्था या संदर्भात सविस्तर माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिलखुलास’ मध्ये दिली आहे.