अनलॉक ४ चे आदेश मराठी भाषेत प्रसिद्ध

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. ४ : निर्बंध शिथिल करणे व टाळेबंदी टप्प्या टप्प्याने उठवणे  (Unlock ४) संदर्भातील आदेश मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दि. १ सप्टेंबर २०२० पासून निर्बंध शिथिल करणे व टाळेबंदी टप्प्या टप्प्याने उठवणे  (Unlock ४) बाबत दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश इंग्रजी व मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले असून ते शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.