पूरग्रस्तांसाठी १६ कोटी ४८ लाखाचा निधी मंजूर : मदत व पूनर्वसन मंत्री

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आले वडेट्टीवार धावून

नागपूर/चंद्रपूर दि.४ सप्टेंबर : नागपूर विभागात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत वाटप तसेच मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. आजच भंडारा दौऱ्यावर असतांना वडेट्टीवार यांनी निधीची घोषणा केली व शासन निर्णय निर्गमित केला.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणि सोडल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे ५ मीटर पर्यंत पाणी सोडावे लागल्याने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ पेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व नागरिकसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले. या चारही जिल्हयातील आलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यात येणार असून यासाठी महाविकास आघाडी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे असे आश्वासन त्यांनी दिले व दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली. त्यानुसार आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील ६ जिल्हयातील मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना सहाय्य व मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरीता ८ कोटी ८६ लाख २५ हजार रूपये व घराची अंशता: क्षती झालेल्या मदतीसाठी ७ कोटी १५ लाख व मदत छावण्या चालविण्यासाठी ४७ लाख रूपये असे एकूण १६ कोटी ४८ लाख २५ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर जिल्हयासाठी ५ कोटी, वर्धा २ लाख २५ हजार, भंडारा ५ कोटी, गोंदीया १ कोटी, चंद्रपूर ५ कोटी व गडचिरोली जिल्हयासाठी ४६ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. भंडारा दौऱ्यावर असतांना दिलेला शब्द श्री. वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.