आठवडा विशेष टीम―
पोकरा योजनांचा आढावा आज बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपसंचालक अरुण वाघमारे, कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
व्यक्तीगत लाभाच्या योजना, सामूहिक लाभाच्या योजना व शेती गट व कंपणी यांच्या लाभाच्या योजना या प्रकारचे वर्गीकरण करावे. त्याप्रमाणे नियोजन करुन शेतकऱ्यामध्ये पोकरा योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी पॉम्पलेट छापावे. योजनाची अंमलबजावणी परिपूर्ण करावी. कोणीही कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश, यावेळी संबंधिताना दिले. पोकर योजनेअंतर्गंत निवड झालेल्या प्रत्येक गावांनी सार्वजनिक कामे सूचवावे व त्यांचा प्रस्ताव एकत्रीत सादर करावे, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिले. कट्यार गाव शेतीसाठी दत्तक घेवून पोकरामधील सर्व कामाचा त्यात समावेश करावा. जमिनीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी एक योजना तयार करावी. यासाठी आवश्यकता वाटल्यास विशेष बाब म्हणून शासनस्तरावर मंजूर घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात 485 गावांची पोकरा योजना अंतर्गत निवड झाली असून आतापर्यंत 47 हजार 962 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 21 हजार 160 अर्ज वैद्य ठरले असून 3 हजार 23 लाभार्थ्यांना 6 कोटी 16 लक्ष रुपयांचे निधीचे वितरण करण्यात आले असल्याचे माहिती पोकरा प्रकल्प विशेषज्ञ सागर डोंगरे यांनी दिली. सामूहिक लाभाच्या योजनेअतर्गंत 17 बचत गट किवा शेतकरी उत्पादक गट यांना गोदाम, कृषि औजारे बँक, प्रक्रिया युनिट आदीसाठी अनुदान देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.