इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याचे नावलौकीक करा – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अकोला, दि.4- इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याला नावलौकीक मिळवून द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सन 2019-2020 चे जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, क्रीडा प्रशिक्षक सतिशचंद्र भट आदी उपस्थित होते.

गुणवंत खेळाडू पुरस्कार मो. राहिल मोहम्मद रफिक याला बॉक्सींग खेळाकरिता, गुणवंत खेळाडू पुरस्कार दिया कैलास बचे बॉक्सींग खेळाकरिता, गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग सुनील भाऊराव वानखडे व्हीलचेअर फेन्सीग, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार संतोषकुमार पंजवाणी वेटलिफ्टींगसा , गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार वंदना पिंपळखरे यांना ना. बच्चू कडू यांच्या हस्ते 10 हजार रोख, प्रमाणपत्र व स्मृती चिन्हसह देण्यात आला. तसेच जिल्हा प्रशिक्षण केन्द्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॉक्सींगचे खेळाडू अनंता चोपळे, साक्षी गायधनी, हरिवंश टावरी, अब्दुल सुफीयाम फईम, अजय पेंडोर, पुनम कैथवार, शिवाजी गेडाम, विधी रावल व गौरी जयसिंगपूरे यांचा सत्कार ना. बच्चू कडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.