पाटोदा तालुकाबीड जिल्हासामाजिक

पाटोदा येथे महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

"माणुसकीची भिंत चा उपक्रम"

पाटोदा (शेख महेशर): पाटोदा येथे नवनिर्माण प्रा.कन्या शाळा या ठिकाणी महिला दिना निमित्त जागतिक खेळाडू डी.वाय.एस.पी राहुल आवारे यांच्या मातोश्री शारदाताई बाळासाहेब आवारे व खेलो इंडिया सुवर्णपदक विजेता खो-खो खेळाडू विजय शिंदे यांच्या मातोश्री नंदा जयराम शिंदे व सारिका जनार्दन कदम अंगणवाडी शिक्षिका यांचा सत्कार संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना पाटोदा व माणुसकीची भिंत पाटोदा यांच्या आयोजनातून करण्यात आला होता.या वेळी सुरेखा ताई खेडकर यांनी बोलताना सांगितले की आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज आपल्या पाटोद्याचा राहुल आवारे यांनी पाटोद्याचे नाव जगाच्या नकाशावर निर्माण केले त्याला घडवण्यात त्याच्या मातोश्री शारदा आवारे यांचा मोलाचा वाटा आहे असे त्या म्हणाल्या व माणुसकीची भिंत ने घेतलेला हा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. तर दलित मित्र एकबाल पेंटर यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व व सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्तींचे सत्कार करण्यात आले. प्रस्तावना माणुसकीची भिंतचे संयोजक पञकार दत्ता देशमाने यांनी केली या वेळी महेंद्रजी गर्जे (माजी जिल्हा परिषद सभापती) व दलित मित्र एकबाल पेंटर , गणेश कवडे (पाटोदा तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस) , रामदास भाकरे(संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पाटोदा) , अक्षय अडसूळ (तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) , नवनिर्माण शाळेच्या मुख्याध्यापक भोपळे मॅडम , सोंडगे मॅडम , कीर्ती मॅडम, भोसले मॅडम , कोकाटे सर, आर्टिस्ट दत्ता वाघमारे , थोरवे मॅडम , स्वामी मॅडम इत्यादीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सोंडगे मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.