आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 7 : आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, अवर सचिव महेश वाव्हळ, कक्ष अधिकारी ल.ना.सदाफुले आदी उपस्थित होते.