आठवडा विशेष टीम―
मंत्रालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या 3 ते 4 वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेन.