बीड जिल्हा

महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा―उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर

बीड,दि.८ : महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात त्यांनी प्रगती साधली असून मतदारामध्ये जनजागृतीचे कामही महिलांनी उत्कृष्टपणे पार पाडले आहे. महिलांनी जिल्हयात होणारी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये सक्रीयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, महिलामध्ये कोणतेही काम चोखपणे करण्याची जिद्द, चिकाटी, ध्येय असते. त्याचा त्यांनी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.

यावेळी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती चाटे, सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका सृष्टी सोनवणे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवने, विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, नायब तहसीलदार आर.बी. नागरे इत्यादी उपस्थित होते.
आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला असून निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित करण्यात आले आहेत. 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलींचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी www.nvsp.in या वेबसाईटवर जाऊन नवीन मतदारांना आपले नाव समाविष्ठ करण्याची जलद प्रक्रिया असल्याचे श्री. धरमकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने निवडणूक काळात सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी C-VIGIL ॲप्स विकसित करून दिले असून या ॲप्सवर आचार संहीता भंग, पैसे वाटप, दारू विक्री, मतदानासाठी प्रलोभने दाखविणे या प्रकारच्या तक्रारींचे फोटो, व्हिडीओ कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचा-यानां जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगणकाव्दारे ही माहिती दिली.
सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका श्रृष्टी सोनवणे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून याचा समतोल राखयचा असेल तर वन्यजीवाचे रक्षण करायला पाहिजे. वन्यजीव हे जंगलात राहतात जंगले नष्ट झाल्याने त्यांची संख्या घटत असून जंगलाचे जतन करणे ही काळाजी गरज बनली आहे. वन्यजीवांचा मानवी जीवनात मोलाचा सहभाग असून सर्वानी वन्यजीव जपण्याचा संकल्प केला पाहिजे. उपविभागीय अधिकारी श्रीमती चाटे म्हणाल्या की, आज विविध व्यवसायाच्या माध्यमातून महिला सक्षम होत असून मतदार प्रक्रियेत तिने आपली नैतिक जबाबदारी निभावली पाहिजे. मतदान हा आपला हक्क असून तो बजवायलाच पाहिजे यामुळे आपली लोकशाही बळकट होते. दिव्यांग,वृध्द या मतदारांसाठी मतदान केंद्रावर त्यांची व्यवस्था केली असल्याचे श्रीमती चाटे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती भणगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी 39-बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिका-यांनी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करुन त्यांची नावे मतदान यादीमध्ये समाविष्ठ करण्याची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली व पुढील कामेही ते चोखपणे पार पाडतील यासाठी श्री. धरमकर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमास विविध शाळेच्या विद्यार्थीनी, महिला, पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सायली काकडे यांनी केले तर आभार सय्यद बेगम यांनी मानले.

मुलींचा जन्मदर वाढला असून 866 वरुन 890 वर
मुलीचा जन्मदर वाढला असून तो 2014 मध्ये 1 हजार पुरुषामागे 866 होता तर 2019 मध्ये एक हजार पुरुषामागे 890 झाला असून बीड जिल्हयासाठी जागतिक महिला दिनानिमित्त ही अभिमानाची बाब आहे. मुलीचा जन्मदर वाढणे म्हणजे मुलीबाबत पालकामध्ये सकारात्मक विचाराचे बीज रुजले असल्याचे हे फलीत दिसते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.