आठवडा विशेष टीम―
राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना काळात विविध प्रकारे सेवाकार्य करणाऱ्या १८ सेवाभावी संस्थांचा राजभवन येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. लोढा फाऊंडेशनच्यावतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
निराकार परमेश्वर कधी गरीब बनून, तर कधी याचक रूपाने, तर कधी रुग्ण होऊन आपल्यासमोर येत असतो. अशावेळी समोर आलेल्या गरजू व्यक्तीची सेवा हीच परमात्म्याची पूजा असते असे सांगून, सेवा कार्य सातत्याने करण्याचे आवाहन राज्यपालांनी सर्व सेवाभावी संस्थांना केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन, धरमपूर, ‘जितो’ वाळकेश्वर, जिओ, दिव्यज फाउंडेशन, दोस्ती – कामाठीपुरा, पंचमुखी सेवा संस्था, राजस्थानी महिला मंडळ, श्री हरि सत्संग, विठ्ठल रुक्मिणी मंदीर, मेटल एंड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, बीएपीएस – स्वामीनारायण मंदीर, लोढा फाउंडेशन, अटटारी वेल्फेअर असोसिएशन, क्वेस्ट फाउंडेशन, आरजू फाउंडेशन, अरज व भारतीय जैन संघटना या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शाह, मंजू लोढा, डॉ. बिजल मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.