सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात बुधवारी अचानक बदलत्या वातावरणाने शहरवासीयांना उकाडा असह्य झाला होता.त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना घामाच्या धारा लागलाय होत्या.सोयगाव तालुक्यात मंगळवार पासून अचानक वातावरणात बदल झाला आहे.पाहते गारवा,दुपारनंतर कडाक्याचे उन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण या तिहेरी वातावरणात सोयगाव तालुक्यातील नागरिक होरपळत आहे.
सोयगाव तालुक्यातील अचानक बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत असून ऐन कोरोना काळात आरोग्य क्घारब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तिहेरी वातावरणात पिकांनाही फटका बसला आहे.सायंकाळी रिमझिम पावूस होणे हे नित्याचेच झाले आहे.
दमट वातावरण आणि वाढत्या उन्हाची धग यामुळे सोयगाव तालुका दुपारी तापला होता.त्यामुळे सोयगाव तालुक्यातील नागरिक घामेघूम झाले होते.