कोकण विभागातील कोविड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात―आण्णासाहेब मिसाळ

आठवडा विशेष टीम―

नवी मुंबई, दि.08 : कोविड-19 च्या आजाराने कोकण विभागातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करावी, असे आदेश आज कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.

राज्यातील ज्या महानगरपालिकेत सॅम्पल पॉझिटिव्ह रेशियो जास्त आहे. अशा ठिकाणी तपासणीच्या संख्या मोठया प्रमाणावर वाढविण्यात यावेत. जेणेकरून आजाराचे निदान होऊन मृत्यूदर कमी होईल. तसेच सद्यस्थिती रुग्ण संख्या विचारात घेऊन एक महिन्यातील वाढ विचारात घेता उपचार सुविधा म्हणजे आयसीयु, ऑक्सीजन सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना विभागीय महसूल आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या.

या शिवाय वादळात झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप, सातबारा, संगणीकरण, ई-फेरफार याबाबत उर्वरित कामे तात्काळ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.

यावेळी कोकण विभागातील जिल्हाधिकारी ते तहसिलदारपर्यंतची टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन विभागीय आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपायुक्त (महसूल) श्री.सिध्दाराम सालीमठ, उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (करमणूक) श्रीमती सोनाली मुळे, उपायुक्त (पुनर्वसन) श्री.पंकज देवरे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव आदि उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.