शिरूर:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पिंपळनेर जि. प च्या अनेक गावांमध्ये भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन शिरूरच्या शाखेंनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी राजा
संतापला असुन कर्ज मिळण्यासाठी दि.15सप्टेंबर मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असल्याची माहिती जि प सदस्य
रामदास बडे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,शिरूरकासार तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये बँकेचे अधिकारी कर्जाबाबतीत हिटलर सारखे वागत आहेत.कर्जाची मागणी केली तर कुत्र्यासारखे धावतात त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीला शेतकरी वैतागला आहे. पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये शिरूरकासार च्या स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन्ही शाखेच्या कर्मचारी यांनी अनेक कर्ज मागणीसाठी शेतकरी गेले असता हकलुच लावले त्यामुळे शेतकरी राजा संतापला असुन कर्जासाठी नाविलाजास्तव घंटानाद आंदोलन करित आहे. दि.१५ सप्टेंबर, मंगळवार रोजी दोन्ही बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन होणार असून
तिव्र स्वरूपाचे असणार असल्याचेही पिंपळनेर जि प गटाचे सदस्य तथा पंकजाताई समर्थक रामदास बडे यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.