खाद्य सुरक्षा जनजागृती मोहिम मुंबई विभागाची प्रशंसनीय कामगिरी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १० : अन्न पदार्थांच्या सुरक्षा राखली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, मुंबईतर्फे करण्यात आलेली जनजागृती मोहिम देशात अव्वल ठरली असून ही प्रशंसनीय कामगिरी आहे, असे गौरवोद्गार अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काढले आहेत.

ऑगस्ट २०२० मध्ये पावसाळ्यातील खाद्य सुरक्षा (Food Safety During Monsoon) या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम देशा अंतर्गत 30 शहरांमध्ये ही मोहिम राबविण्यात आली होती. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरांचा यात समावेश होता. यात मुंबई विभागाने ४५० गुणांक मिळवुन देशामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण व नेट प्रो फॅन (NetProFan) यांच्यातर्फे मुंबई विभागास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा यांची लोकांमध्ये जागृती होण्यासाठी ध्वनीफित, गाणे, कविता तयार करणे, सोशल मीडिया कार्यक्रम, (Twitter, Facebook, Instagram) यामधुन जागृती करणे, ऑनलाईन वेबिनार वेगवेगळया भाषांमधील 2-3 मिनिटांच्या चित्रफित, तसेच डिजीटल क्रियेटिव स्पर्धा (Digital Creative Competition,) पाककला स्पर्धा (Recipe Competition), पोस्टर स्पर्धा (Poster Competition) असे विविध प्रकारे उपक्रम राबविण्यात आले. त्यांना गुणांकन देण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत ऑगस्टमध्ये मुंबई विभागाने अनेक वेबिनार, खेळ, डिजिटल सृजनशिलता स्पर्धा, पाककला स्पर्धा, यासह ४८ पोस्टर्स, 8 GIFs 4 व्हीडियो तयार करुन व्यापक प्रमाणात जनजागृती केली .

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी राज्य अन्न व औषध प्रशासन तसेच 7 संघटनांना घेऊन NetProFan (Network of Professionals of Food & Nutrition) नावाची संघटना तयार केली आहे, यामध्ये Indian Dietetic Association (IDA), Nutrition Society of India (NSI), Indian Medical Association (IMA), Association of Food Technologist and Scientist (AFSTI). Indian Federation of Culinary Association (IFCA), and Association of Analytical Chemist India Chapter (ABAC), या ७ संघटनांचा समावेश आहे. NetProFan अंतर्गत Safe Food, Healthy Diets. Nutrition, No Food Waste. Food Adulteration या विषयांवर अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण व राज्य अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने जनजागृती केली जाते.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या नेतृत्वात ही मोहिम राबविण्यात आली होती.

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.