Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असे आयसीयु, एचडीयु, डायलिसीस रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या कोविडसेंटरमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, विविध प्रकारचे व्हेंटिलेटर, प्रत्येक बेडसोबत मल्टी पॅरा मॉनिटरची सुविधा देण्यात आली आहे. सर्व बेड्स सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टमला जोडलेले आहे.
नेस्को सेंटरमध्ये उभारलेल्या नव्या केंद्रामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेडस्, आयसीयु बेड्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्यावतीने या केंद्राला सर्व सहकार्य केले जाईल, असे श्री. देसाई म्हणाले.
या केंद्राच्या प्रमुख डॉ. निलीमा आंद्रादे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.