जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― बहुलखेडा-रामपूरवाडी रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावर दुचाकी घसरल्याने जरंडीच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
वसंत पद्माकर राठोड(वय ५२ रा.जरंडी ता.सोयगाव) असे मृताचे नाव आहे.वसंत राठोड हे हनुमंतखेडा येथून जरंडीला घराकडे येत होते यावेळी बहुलखेडा गावाजवळील खड्ड्यात दुचाकी उदळून अपघात झाला या अपघतात त्यांच्या मेंदूला जबर मार लागला आहे.
पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणूसपण ―
जरंडी येथील वसंत राठोड हे अंधारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतांना रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती अचानक बनोटीकडून रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला रस्त्यावर पडलेल्या या तरुणावर लक्ष गेल्याने पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तातडीने घटनास्थळी थांबून रुग्णवाहिका बोलावून त्यांना गंभीर अवस्थेत सोयगावला ग्रामीण रुग्णालयात आणले त्यांचेवर वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन काळे यांनी उपचार करून त्यांना मृत घोषित केले.अपघातात मृत वसंत राठोड यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.त्यांचेवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले