औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सामाजिक क्षेञात काम करणार्या विश्व मराठा संघाच्या औरंगाबाद जिल्हात युवक जिल्हाध्यक्ष पदी श्री.समाधान शिंदे पाटील हे युवा कार्यकर्ते सामाजिक क्षेञात गेली अनेक दिवसांपासुन वेगवेगळ्या सामाजिक क्षेञात कार्यरत आहेत,या तरूण तडफदार नेतृत्वांची दखल घेत विश्व मराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.प्रंशात दादा भोसले व महीला प्रदेशाध्यक्ष सौ.छायाताई भगत यांनी युवा नेतृत्व शिवचरीञ अभ्यासक समाधान शिंदे पाटील यांची विश्व मराठा संघाच्या संभाजीनगर युवक जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती पञ दिले.संभाजीनगर जिल्हात मराठा समाजाच्या न्याय आणी हक्कासाठी लढा देण्याची जबाबदारी संघटनेच्या वतीने समाधान शिंदे यांच्याकडे देण्यात आली.विश्व मराठा संघाची ध्येय व धोरणे तसेच संघाचे कार्य नि:स्वार्थीपणे सुरू राहील असा विश्वास शिंदे यांनी दिला.या नियुक्ती बद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शेखर दादा पाटील,महीला प्रदेशाध्यक्ष छायाताई भगत तसेच संभाजीनगर जिल्हातील राम नवघरे,राधा लाटे,निव्रत्ती सपकाळ,सोनाली सोनवणे,दिपाली जाधव,सचिन पाटील,वैभव आहेर,राहुल जाधव,जगदीश शेळके,मोहन मालोदे,अजय कोली,राहुल विटेकर,आकांशा पाटील,शितल विटेकर,दक्षता पाटील,किरण पाटील,गजानन राजगुडे,सोमनाथ पवार इ.पदाधिकारी सदस्य यांच्यासह विविध संघटनेच्या वतीेने अभिनंदन करण्यात आले.