आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, दि. १४ : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्या फौजिया खान यांनी आज राज्यसभा सदस्याची शपथ घेतली.
संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ विधी पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी श्रीमती खान यांना शपथ दिली. यापुर्वी २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील सहा सदस्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. फौजिया खान यांनी महाराष्ट्रमध्ये विविध मंत्रीपदे भूषविली आहेत.