पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून शेतक-यांची चेष्टा..!
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
चालू खरीप हंगामात यंदा मूग आणि उडीद पिकाचा पेरा,राज्यात केवळ 15 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही मुग पिकावर रोग पडल्याने व काढणीला जास्त पाऊस झाल्याने पीक शेतक-यांना हाती लागलेल नाही.उडीद पिक जास्तीचा पावसाने नुकसानीत आले.मात्र पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी मुग आणि उडीद या पिकाची हमी भावाप्रमाणे खरेदी सरकार करत असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे अव्हान शेतक-यांना केले आहे.याचाच अर्थ संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांची चेष्टा सरकार करत असल्याचा अरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.अल्पप्रमाणात आलेल्या पिका सोबतच राज्यात 60 टक्के लागवड असलेल्या शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी सरकार का करत नाही.? असा सवाल त्यांनी केला जर खरेदी करायचं असेल तर पणन महासंघाने सोयाबीन करण्याची खरेदी करण्यासाठीची यंत्रणा राज्यात तात्काळ उभारावी अशी मागणी त्यांनी केली आहे .
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,केंद्र सरकारने यंदा खरीप हंगामाच्या पिकासाठी हमीभाव जाहीर करून शेतक-यांना फार मोठा दिलासा दिला आहे.मात्र राज्यात असलेल्या महाअघाडी सरकारने शेतक-यांची चेष्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.? पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी सरकारच्या हमीभाव याप्रमाणे मूग आणि उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शेतक-यांना केलेले आहे.मात्र केवळ मूग आणि उडीद सरकारने खरेदी करणे,म्हणजेच शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून शेतक-यांची चेष्टा हे सरकार करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्याच कारण,राज्यात मुगाचा पेरा केवळ दहा टक्के आहे आणि उडीद पेरा 15 टक्क्यांच्या आसपास आहे.मुग पिकावर रोग पडला आणि जास्तीचा पाउस पडला.ज्यामुळे 2 टक्के पीक ही पदरात पडले नाही.जास्तीच्या पावसाने उडीद पिक नुकसानीत आहे. त्याची लागवड 15 टक्क्यांवर नाही. विदर्भाचा अपवाद वगळता.तिथे पाऊस जास्त झाला.जे पिके शेतक-यांच्या पदरात पडलीच नाही.त्याची खरेदीची भाषा सरकारने करणे हा केवळ विनोद आहे. शेतक-यांची चेष्टा होय,जर सरकारला शेतक-यांच्या हिताची जोपासना करायची असेल.तर सोयाबीन पीक ज्याची 60 टक्के लागवड मराठवाडा आणि विदर्भात आहे. इतर भागात पण,आहे.त्याची खरेदी केंद्र सरकारच्या हमी भावाप्रमाणे चालू करण्यासाठी.सरकारने यंत्रणा उभी केली, तरच यावर्षी खऱ्या अर्थाने शेतक-यांना फार मोठा दिलासा मिळेल.सोयाबीन खरेदी उशिरा जर चालू केली ? तर त्याचा मोठा फटका शेतक-यांना बसेल, ज्याचा फायदा व्यापा-यांना होईल. मागच्या वर्षी सरकारने हरभ-याची खरेदी उशिरा चालू केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान शेतक-यांचे झालं.जे पिक शेतक-यांच्या पदरात कमी पडलं त्याची खरेदी करण्यापेक्षा सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत अशी मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.सरकारला राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नाचं काही देणे घेणे नसून, औपचारीकपणा आणि केवळ पुळका दाखवण्यासाठी घोषणा करण्यात सरकार दंग असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले आहे.