अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
बर्दापूर परिसरातील सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (अ) युवा आघाडीचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांचेसह कार्यकर्त्यांनी मंगळवार,दिनांक 15 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून कार्यालयासमोर हलगी वाजवून आक्रोश आंदोलन केले.
यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (अ) युवा आघाडी अंबाजोगाईच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,बर्दापूर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात पत्त्याचे क्लब,मटका हे अवैध धंदे बंद करावेत. पोलिसांचे दुर्लक्षामुळे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.त्यामुळे अनेक गरीबांचे संसार व जीवन उद्धवस्त होत आहे.मजूरी करणारे लोक अवैध धंद्याच्या आहारी जावून कष्टाने कमवलेले पैसै यामध्ये व्यर्थ खर्च करून नाहक आपला संसार उघड्यावर आणित आहेत.सध्याच्या परिस्थितीमध्ये अवैध धंद्यांमुळे बर्दापूर येथील नागरीक ञस्त आहेत.म्हणून हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अन्यथा या मागणीसाठी आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (अ) युवा आघाडीचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (अ) चे जिल्हाउपाध्यक्ष अॅड.दिपक कांबळे,तालुकाध्यक्ष दशरथ सोनवणे,राहूल गंडले,विकास जोगदंड,बालासाहेब गंडले,भागिरथ कोरडे, विलास वाघमारे,सन्नी वाघचौरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.