प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सह्याद्री वाहिनीवर उद्या 'हैद्राबाद मुक्ती संग्राम : मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष' माहितीपटाचे प्रसारण

आठवडा विशेष टीम― मुंबई दि. 16 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम : मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष’ हा माहितीपट प्रसारित होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले असून निर्मिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.