आठवडा विशेष टीम― मुंबई, दि. १६ – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
“मराठवाडा मुक्तीच्या प्रदीर्घ लढ्यात अनेक ज्ञात – अज्ञात देशभक्त व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढ्यातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो तसेच सर्वांना मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.