अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील योगिराज अर्जुन वाघमारे व परळी तालुक्यातील मौजे घोडा कौडगाव येथील पिराजी काळे या दोघांच्या खुन प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावे व त्यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट कलम (चार) प्रमाणे कार्यवाही करा या मागणीसाठी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या युवा आंदोलन संघटनेच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात येवून उपजिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
य
ुवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,दिनांक 15 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,पिराजी काळे आणि योगिराज वाघमारे यांच्या खुन प्रकरणातील आरोपींना अटक करा,खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणा-या पोलीस अधिकारी यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट कलम (4) प्रमाणे कार्यवाही करा,पिराजी काळे व योगिराज वाघमारे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा,अॅट्रासिटी अॅक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करा तसेच सदर दोन्ही खुनाचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आदी मागण्यांचा समावेश आहे.या प्रश्नी शासन व प्रशासनाने टाळाटाळ केली तर संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, धिमंत राष्ट्रपाल, अविनाश हजारे,मुंजा काळे, धर्मराज साळवे, नितीन होलबोले, रामराजे वाघमारे, चंद्रकांत कांबळे, शिवराज वाघमारे, लक्ष्मण झुंजाटे, अजय हारगावकर, नामदेव कांबळे, दत्ता उपाडे, दिलीप पालके, जालिंदर कसाब यांच्या स्वाक्ष-या आहेत.