आठवडा विशेष टीम―
पोलीस आयुक्तालय नाशिक येथे ‘पोलीस केअर सेंटर’ उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण संदिप घुगे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोना महामारीचा समना करतांना आर्थिक व्यवहास सुरु ठेवण्यासाठी लॉकडाऊनध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या कालवधीत रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी शासनस्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. या संकटाचा समाना करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे. कोरोना कालावधीतील पोलीसांचे आणि डॉक्टरांचे कोविड योध्दा म्हणून केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारीने काळजी घेतली तर सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
या आजारावर उपचार करण्यासाठी आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले असून, या सर्व ठिकाणी योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून कोरोना आजार झलेल्या रुग्णांनी घाबरुन न कोणत्याही कोविड सेंटर मध्ये भरती होवून उपचार घेणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्वांनी कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, नैसर्गिक उपचार पद्धती व मानसिक आरोग्यवर भर दिला पाहिजे. सामाजिक बांधिकीच्या जाणीवेतून आपण सर्वांना या संकटाशी सामना करायचा असुन, ही लढाई जिंकायची असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील: राधाकृष्ण गमे
कोरोना या जागतीक महामारीचा सामना करण्यासाठी शासनस्तरावर वेळो वेळी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना लवकरात लवकर बरे करुन, मृत्युदर कसा कमी करता येईल यावर भर देण्यात येत आहे. यासाठी रुग्णांचे मनोबल वाढविणे त्याचे मानसिक आरोग्याचा समतोल राखणे यावर भर देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांनावर नैसर्गिक उपचार पध्दतीचा अवलंब केले तर ते त्यातून लवकर बरे होतील. म्हणून या दृष्टीने सेवा देणे आवश्यक असणार आहे, असेही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले.
कोविड योध्दा म्हणून कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी शासन सदैव: सूरज मांढरे
लॉकडाऊन कालवधीत शिथिलता दिल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थतीत पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रुग्णांशी संपर्क येत असल्याने त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. त्यांचासाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणा देणारा ठरणार आहे. अनेक महिन्यापासून आपण कोरोना संकटाशी सामना करीत आहोत. या कालावधीमध्ये अनेकांनी कोविड योध्दा म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. पोलीसांच्या अरोग्य सेवे साठी हक्काचे ठीकाण असावे या साठी हे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यांचे हे कार्य लक्षात घेता शासन सैदव त्यांच्या पाठीशी आहे असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले .
कोरोनासाठी नैसर्गिक उपचारपध्दतीचा अवलंब करावा : दीपक पाण्डेय
कोविड योध्दा म्हणून कोरोना कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. हे कार्य करत असतांना त्यांनाही या आजाराचा सामना करावा लागला आहे. त्यांचे हे कार्य लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तालय येथे ऑक्सीजन बेड असलेले 35 खाटांचे पोलीस कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून संशयित रुग्ण तसेच प्रत्यक्ष पॉझेटीव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. हे उपचार करीत असतांना नैसर्गिक उपचार पध्दती अवलंब केला जाणार असून, मानसिक आरोग्य आणि योग पध्दतीचाही अवलंब केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी या कार्यक्रमातून दिली आहे.
कोविड सेंटर साठी दोन रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या कोविड सेंटर मध्ये भरती झल्यावर नातेवाईकांना दिवसातून दोन वेळा सोशल डिस्टंसिगचे नियम पाळून भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांना हे सेंटर बघण्यासाठी उद्या दिनांक 19 सप्टेंबर रोजी एक दिवस खुले करण्यात येणार असल्याचेही श्री. पाण्डेय् यांनी यावेळी सांगितले.