अंबाजोगाई तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

बीड: पोलिसांवर कारवाईसाठी अंबाजोगाईत हमाल मुकादमाचे बेमुदत उपोषण

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अमानुषपणे मारहाण करणा-या पोलिसांची तक्रार केल्याने जिवीताला धोका निर्माण झाला आहे.तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून नाहक मारहाण करणा-या संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देवून अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल मुकादम तुकाराम सोपान वारकरी हे सोमवार,दिनांक 21 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.

येथील हमाल मुकादम तुकाराम सोपान वारकरी (रा.जयभीम नगर,मोरेवाडी,अंबाजोगाई.जि.बीड) यांनी अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी यांना 11 व 18 सप्टेंबर रोजी निवेदन दिले.सदरील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक,अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक यांना माहितीस्तव दिले आहे.त्यात नमुद केले आहे की,अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या 2 कॉन्स्टेबल यांनी कोणते ही कारण नसताना 9 ऑगस्ट 2020 रोजी आपणांस अमानुषपणे बेदम मारहाण केली.यात आपला हात फ्रॅक्चर झाला.मारहाणीत मोबाईल फुटला.तसेच उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केला.जिथे घटना घडली तेथील सि.सी.टि.व्ही फुटेज पाहून सत्यता तपासा.या अन्यायकारक घटनेत आपणांस न्याय मिळावा.जो पर्यंत संबंधित पोलिसांवर प्रशासनाकडून कारवाई होत नाही.तो पर्यंत आपण व कुटुंबिय बेमुदत उपोषण करीत असल्याचे निवेदक तुकाराम सोपान वारकरी यांनी निवेदनात म्हटले आहे.वारकरी हे सोमवार,दिनांक 21 सप्टेंबर पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करीत आहेत.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.