आठवडा विशेष टीम―
मुंबई दि. 23: कालपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहावे. या संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे.
एनडीआरएफच्या पाच तुकड्यादेखील तैनात करण्यात आल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.